Posts

कॉलेज किती बदललय आता ?

कॉलेज किती बदललय आता ? कॉलेज खरंच बदललय का आता तर हो, वीस ची लस्सी पस्तीस ला झालीय, डोसेवाले काका बदललेय आता, काळी पॅन्ट निळी झालीय आणि पांढरा शर्ट  निळा झालाय, ओळखीचे चेहरे कमी झाले आणि ते होणारच, काही गोष्टी मात्र तश्याच आहेत, कॉलेजचा रंग मात्र अजून तसाच आहे, कॉलेजच्या वाटा तश्याच आहेत, इमारतींची आगगाडीसारखी रांगही तशीच आहे, कॅंटीनचे रेट बदलले खुर्च्या मात्र तश्याच आहेत, कॉलेजमध्ये कुणी विचारलं नाही मला, मात्र भिंती म्हटल्या कसा आहेस, विसरला नाहीस ना आम्हाला, खिडक्याही मग म्हटल्या मोकळा श्वास आठवतोय ना, झाडांनीही गोड हास्य दिल, कुणाला भेटलो नाही मी, मात्र मनसोक्त कॉलेज फिरलो, कदाचित कॉलेजच्या जुन्या आठवणी शोधतोय, काय केलं नि काय नाही याचा हिशोब पडताळतोय, भूतकाळात हरवणं प्रत्येकाला आवडत पण, कॉलेजच्या आठवणी वेगळ्याच असतात, आयुष्याच्या शिदोरीत मोठा वाट असतो यांचा, एक गोष्ट मात्र नक्की बदलीयय, ती म्हणजे तुमचा presence By- Shinde Shivaji Sahebrao

नाशिक ते दादर

नाशिक ते दादर  सकाळी लवकर नाशिकरोड स्टेशनवर पोहचलो पण ट्रेन पकडायचा मोठा यक्षप्रश्न. आजपर्यंत ट्रेनने एकट्याने प्रवास केलाच नव्हता मात्र रेल्वे स्टेशनच्या गटेवरच LED डिस्प्ले ने मला रस्ता दाखवला. पंचवटी एक्सप्रेस ७.०७ ला येउन ७.१० ला निघणार समजल. अखेर मी न्यूजपेपर घेवून प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर पोहचलो. ट्रेन आली ती ७.१५ ला. मी रिझरवेशन केल्या प्रमाणे डी ३, ४८ मध्ये जावून बसलो आणि  सुरु झाला माझा दादरचा प्रवास. समोर एक छानस कुटुंब बसलं होत. जरी वातावरणात गारवा असला तरी मी मात्र खिडकी उघडी ठेवली होती. न्यूजपेपर मध्ये लक्ष घालण्याचा पर्यंत केला मात्र बाहेरच सौंदर्य मला त्यात डोकावून देयेना. अखेर मी न्यूजपेपर सोडून बाहेर लक्ष घातल. वाऱ्याचा तो गारवा जरी ट्रेनच्या वेगाबरोबर वाढत असला तरी तो नकोसा वाटलाच नाही. थोड्यावेळाने सुर्यानारायानाचे दर्शन झाले नि मन प्रसन्न झाले. देवळाली, इगतपुरी स्टेशन जात होते. बाहेरची शेती बघण्यात मी दंग होतो. तस म्हटलं तर गव्हाच शेत जरा अंतरानेच दिसत होत मात्र वाळलेल्या गवताच्या पेंढ्या मात्र जागोजागी दिसत  होत्या. यातच  समोरच्या कुटुंबाने त्य...