कॉलेज किती बदललय आता ?
कॉलेज किती बदललय आता ?
कॉलेज खरंच बदललय का आता
तर हो, वीस ची लस्सी पस्तीस ला झालीय,
डोसेवाले काका बदललेय आता,
काळी पॅन्ट निळी झालीय आणि पांढरा शर्ट निळा झालाय,
ओळखीचे चेहरे कमी झाले आणि ते होणारच,
काही गोष्टी मात्र तश्याच आहेत,
कॉलेजचा रंग मात्र अजून तसाच आहे,
कॉलेजच्या वाटा तश्याच आहेत,
इमारतींची आगगाडीसारखी रांगही तशीच आहे,
कॅंटीनचे रेट बदलले खुर्च्या मात्र तश्याच आहेत,
कॉलेजमध्ये कुणी विचारलं नाही मला,
मात्र भिंती म्हटल्या कसा आहेस,
विसरला नाहीस ना आम्हाला,
खिडक्याही मग म्हटल्या मोकळा श्वास आठवतोय ना,
झाडांनीही गोड हास्य दिल,
कुणाला भेटलो नाही मी,
मात्र मनसोक्त कॉलेज फिरलो,
कदाचित कॉलेजच्या जुन्या आठवणी शोधतोय,
काय केलं नि काय नाही याचा हिशोब पडताळतोय,
भूतकाळात हरवणं प्रत्येकाला आवडत पण,
कॉलेजच्या आठवणी वेगळ्याच असतात,
आयुष्याच्या शिदोरीत मोठा वाट असतो यांचा,
एक गोष्ट मात्र नक्की बदलीयय,
ती म्हणजे तुमचा presence
By- Shinde Shivaji Sahebrao
कॉलेज खरंच बदललय का आता
तर हो, वीस ची लस्सी पस्तीस ला झालीय,
डोसेवाले काका बदललेय आता,
काळी पॅन्ट निळी झालीय आणि पांढरा शर्ट निळा झालाय,
ओळखीचे चेहरे कमी झाले आणि ते होणारच,
काही गोष्टी मात्र तश्याच आहेत,
कॉलेजचा रंग मात्र अजून तसाच आहे,
कॉलेजच्या वाटा तश्याच आहेत,
इमारतींची आगगाडीसारखी रांगही तशीच आहे,
कॅंटीनचे रेट बदलले खुर्च्या मात्र तश्याच आहेत,
कॉलेजमध्ये कुणी विचारलं नाही मला,
मात्र भिंती म्हटल्या कसा आहेस,
विसरला नाहीस ना आम्हाला,
खिडक्याही मग म्हटल्या मोकळा श्वास आठवतोय ना,
झाडांनीही गोड हास्य दिल,
कुणाला भेटलो नाही मी,
मात्र मनसोक्त कॉलेज फिरलो,
कदाचित कॉलेजच्या जुन्या आठवणी शोधतोय,
काय केलं नि काय नाही याचा हिशोब पडताळतोय,
भूतकाळात हरवणं प्रत्येकाला आवडत पण,
कॉलेजच्या आठवणी वेगळ्याच असतात,
आयुष्याच्या शिदोरीत मोठा वाट असतो यांचा,
एक गोष्ट मात्र नक्की बदलीयय,
ती म्हणजे तुमचा presence
By- Shinde Shivaji Sahebrao
Comments
Post a Comment