नाशिक ते दादर
नाशिक ते दादर
सकाळी लवकर नाशिकरोड स्टेशनवर पोहचलो पण ट्रेन पकडायचा मोठा यक्षप्रश्न. आजपर्यंत ट्रेनने एकट्याने प्रवास केलाच नव्हता मात्र रेल्वे स्टेशनच्या गटेवरच LED डिस्प्ले ने मला रस्ता दाखवला. पंचवटी एक्सप्रेस ७.०७ ला येउन ७.१० ला निघणार समजल. अखेर मी न्यूजपेपर घेवून प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर पोहचलो. ट्रेन आली ती ७.१५ ला. मी रिझरवेशन केल्या प्रमाणे डी ३, ४८ मध्ये जावून बसलो आणि सुरु झाला माझा दादरचा प्रवास. समोर एक छानस कुटुंब बसलं होत. जरी वातावरणात गारवा असला तरी मी मात्र खिडकी उघडी ठेवली होती. न्यूजपेपर मध्ये लक्ष घालण्याचा पर्यंत केला मात्र बाहेरच सौंदर्य मला त्यात डोकावून देयेना. अखेर मी न्यूजपेपर सोडून बाहेर लक्ष घातल. वाऱ्याचा तो गारवा जरी ट्रेनच्या वेगाबरोबर वाढत असला तरी तो नकोसा वाटलाच नाही. थोड्यावेळाने सुर्यानारायानाचे दर्शन झाले नि मन प्रसन्न झाले. देवळाली, इगतपुरी स्टेशन जात होते. बाहेरची शेती बघण्यात मी दंग होतो. तस म्हटलं तर गव्हाच शेत जरा अंतरानेच दिसत होत मात्र वाळलेल्या गवताच्या पेंढ्या मात्र जागोजागी दिसत होत्या. यातच समोरच्या कुटुंबाने त्यांचा जेवणाचा डबा उघडला. खर सांगायचं झाल तर त्या मसालेदार फ्लावरच्या भाजीने माझ्या तोंडाला पाणी सुटल होत मात्र मी उगाचच बाहेर लक्ष द्यायचा प्रयत्न करत होतो. पळणारी झाडे बघून " मामाच्या गावाला जाऊ या " गाण्याचे बोल माझ्या ओठांवर अनपेक्षित आले. कुठेतरी साचलेल्या पाण्यावरून परावर्तीत झालेली सूर्याची किरणे खूप विलोभनीय होती. मध्येच ती किरणे लगतच्या ट्रॅकबरोबरआम्हाबरोबर धावत होती. आज न जाने का पण ट्रेनमध्ये होणारी फेरीवाल्यांची ओरड मात्र नकोशी वाटत नव्हती. मधेच एक मुलगा डॉल विकण्यासाठी आला. समोर बसलेल्या छोटीला बाहुली घेण्याचा मोह आवरता आला नाही व तिने एक छानसी पर्पल कलरची बाहुली घेतली. अनेक रंगांच्या सुंदर-सुंदर बाहुल्या त्या मुलाकडे होत्या. कोण टोपिवली, कोण मोकळ्या केसावाली तर कोण छानश्या वेण्या बांधलेली होती. चाहवाल्यांचा, बुकवाल्यांचा फेरा चालूच होतो. ट्रेन दादरला पोहचण्याची वेळ १०.३० होती. असच मग दिवा-ठाणे- विक्रोळी-घाटकोपर-सायन करत अखेर मी दादर गाठले.
By- Shinde Shivaji Sahebrao

मस्त लिहलय एकदम
ReplyDeleteमस्त लिहलय एकदम
ReplyDelete